प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे ७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

203

– खासदार अशोक नेते यांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली , १८ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने महिला व बाल रुग्णालय येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवाडा सेवा सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात ७२ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व युवकांना मार्गदर्शन करतांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. नरेंद्र मोदी देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी रक्तदान शिबिराच्या निमित्ताने खा.अशोक नेते यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,( हेल्थ कार्डचे प्रमाणपत्र) व रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरीत करुन फळेसुद्धा वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमसुध्दा करण्याचे ठरविले.
या कार्यक्रम निमित्ताने खा.अशोकजी नेते, डॉ.किलनाके यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन करुन रक्तदानाचे महत्त्व सांगितले. संचालन जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोक नेते , प्रदेशसरचिटणीस (संघटन) भाजपा एसटी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रकाश गेडाम, जिल्हामहामंत्री प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चाचे चांगदेव फाये, सर्कप्रमुख विलास पा.भांडेकर, पं.स.माजी.उपसभापती विलास दशमुखे,चव्हाण, डॉ.किलनाके, माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, माजी जि.प.अध्यक्षा योगिताताई भांडेकर, माजी.नगरसेविका वर्षाताई शेडमाके, लताताई लाटकर न.से., वैष्णवी नैताम न.से, कविताताई उरकुडे, प्रतिभाताई चौधरी, रश्मीताई बाणमारे, वनमालाताई कन्नाके, बंडूजी झाडे, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, विवेक बैस, राजु शेरकी, शहर अध्यक्ष सागर कुमरे, युवा महामंत्री अनिल तिडके, हर्षद गेडाम शहरमहामंत्री, मधुकर भांडेकर महामंत्री, आशिष कोडाप युवा प्रमुख, आशिष रोहनकर युवा उपाध्यक्ष, पायल कोडापे युवती प्रमुख, पारस राऊत शहर उपाध्यक्ष, धनंजय सहदेवकर, आनंद कुमरे, संजय मांडवगडे, मंगेश रणदिवे, तसेच अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here