– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
The गडविश्व
सावली, १८ सप्टेंबर : भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीनेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा सप्ताह कार्यक्रम निमित्ताने स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट व्याहाड खुर्द येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकनेते यांनी रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व युवकांना मार्गदर्शन करतांना या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहे. देशातील गोर-गरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतातअसे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, महामंत्री सतीश बोमावार, कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, माजी बांध. सभापती संतोषभाऊ तंगडपलीवार, माजी.जि.प.सदस्या योगिताताई डबले, माजी.पं.स.गणपत कोठारे, ज्येष्ठ नेते प्रकाश पा.गडमवार, कुनघाडकर, ओबीसी तालुका अध्यक्ष कवींद्र रोहनकर, माजी.सभापती कृष्णाभाऊ राऊत, मोहन चन्नावार, मोतीराम चिमुरकर, युवा नेते किशोर वाकुडकर, निखिल सुरमवार, नामदेव भोयर, जितू सोनटक्के, मुकेश बिके, दिवाकर गेडाम, तुळशीदास भुरसे, प्रदीप कुकुडकर, मनोहर कांबळे, विकास कोहळे, किरण सुरजागडे, रमेश नापे, लोकनाथ रायपुरे, रोशन गुरुनुले, लखन नापे, तसेच अनेक भाजपाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन स्फुर्तपणे, उत्साहाने, आनंदाने युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.