– स्वतंत्र इमारत व विविध समस्या समस्यांचा विळख्यात असल्याचा विद्यार्थ्यांच्या पालकांचा आरोप
The गडविश्व
ता. प्र / धानोरा ( गडचिरोली ) १९ सप्टेंबर : आदिवासी विकास विभाग गडचिरोली प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा गडचिरोली येथील इमारतीत एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल चामोर्शी व गेवर्धा येथील नावाने सुरू असुन येथे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यां शिक्षणा पासून वंचित असुन इमारतीसह विविध समस्या समस्यांचा विळख्यात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचे पालक करित आहेत.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक ऑल कमिशनर्स ट्रायबल डेव्हलपमेंट महाराष्ट्र स्टेट नाशिक अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंट स्कूल चामोर्शी आणि गेवर्धा येथील शाळा सध्या शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रम शाळा गडचिरोली येथे सुरु आहेत. सध्या गडचिरोली येथील प्रकल्पा अंतर्गत असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिन शाळेचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात चवर्षी १ ते ४ आणि ६ ते १० वर्ग आहेत. गेवर्धा ६ ते ९ वर्ग आहेत दोन्ही शाळेचे अंदाजे ५५० विद्यार्थी तर इंग्रजी माध्यमांचे तेव्हढेच असे अंदाजे ११००विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
त्यामुळे एकाच ठिकाणी तिन शाळा भरविने योग्य आहे का ? हाच मोठा प्रश्न निर्माण होत आहे. येथील एकलव्य दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे त्या प्रमाणात नाही असा पालकांचा आरोप आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावलेला नाही त्यांच्या वयानुसार शिक्षणाची प्रगती दिसून येत नाहीत. येथील मुलांना कोणतेही शिक्षण दिले जात नाही.वर्ग खोल्या उपलब्ध नसल्याने १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसविले जाते. हि मोठी शोकांतिका आहे. आज पर्यंत शासनाच्या या शाळेला कोणीच भेट दिली नाही का ? शिकविण्यासाठी शिक्षकाची आवश्यकता असतानाही शिक्षकच नाहीत. बसायला जागा नाही. विद्यार्थ्यांना एकत्र कोंबल्यासारखे ठेवल्या जाते. झोपायला बेड नसल्याने विद्यार्थी जमिनीवर झोपतात अशी अवस्था आहे तसेच पाण्याची सुविधाही नसल्याने लहान मुले आंघोळ आणि संडास, बाथरुम करिता वरच्या मजल्यावर पायऱ्या चढून पाणी वर नेतात असे पालकांचे म्हणणे आहे. शाळेत अध्यापक नसल्याने शिक्षण घेणारे विद्यार्थी गुणवत्ता पासून वंचित आहेत.
आधीच कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे दोन वर्ष शिक्षणा अभावी गेले आता दोन महिने उलटूनही शाळेतील विद्यार्थी नाममात्र वर्गात बसविल्या जाते. कोणतेही शिक्षण न देता ही मोठी वाईट परिस्थिती दिसून येते. वर्गशिक्षक नाही, अभ्यासक्रम शिकवले जात नाही, गृहपाठ दिले जात नाही, एकंदरीत शाळेतील विद्यार्थ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्या जात आहेत. इमारतीची व्यवस्था नसताना शाळा एकत्र ठेवल्याच कशा ? एकलव्य शाळेचा निधि खर्च होतो कुठे ? इमारत, विद्युत पुरवठा झोपण्याची व्यवस्था तेथील इमारतीत होतो तर येथील निधी खर्च होतो कुठे ? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. याचा शोध घेवुन संबंधित विभागाने येथील शाळेकडे लक्ष देऊन मुलांच्या शिक्षणाचा दर्जा वाढविण्यात यावा येथील सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी मुलांच्या पालकांनी केली आहे.
येथील मुख्याध्यापक इमले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता शाळेकरिता स्वतंत्र इमारत नाही. वर्ग भरण्यासाठी इमारत अपुरी पडत असल्याचे मान्य केले. दोन पैकी एक शाळा इतरत्र हलविण्याबाबत पत्रव्यवहार शासनाला केल्याचे सांगितले.
