राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

190

-नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली यांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १९ सप्टेंबर : अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली च्या वतीने २६ सप्टेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
या निबंध स्पर्धेत, १) गांधी विचार आणि राष्ट्रीय एकात्मता, २) आज च्या दशकात गांधी विचारांची प्रासंगिकता ३) बापूंशी- वर्तमानावर माझा संवाद हे विषय देण्यात आले आहे.
स्पर्धा ही ऑफलाईन स्वरूपाची असून स्पर्धेचा केंद्र तालुका स्तरावर (आवश्यकता पडल्यास तालुक्यातील २० पेक्षा अधिक स्पर्धक असणाऱ्या मोठ्या गावात देता येईल), १४ ते ३० वयापर्यंत चे स्पर्धक यात भाग घेऊ शकतात, निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी या पैकी कोणत्याही एका भाषेत असावा, निबंधाची शब्दमर्यादा १००० ते १५०० शब्द असावी, स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी होणार असून या तारखेत काही बदल असल्यास किंवा परीक्षा केंद्राविषयी अधिकृत माहिती संबंधित तालुका प्रतिनिधी देतील, निबंध लेखनाकरिता (कागद) साहित्य आयोजकांकडून पुरविण्यात येईल, परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील, आवश्यकता पडल्यास स्पर्धेच्या नियमात बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहणार आहेत.
या स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस ३ हजार १ रुपये स्व.रतनभाई पंजवाणी, माजी जिल्हाध्यक्ष मजूर संस्थेचा संघ यांचे स्मृती प्रित्यर्थ, द्वितीय बक्षीस २ हजार १ रुपये, गुलाबराव मडावी, माजी नगरसेवक न.प.गडचिरोली, तृतीय बक्षीस १ हजार १ रुपये देवाजी सोनटक्के से.नि. शिक्षक तथा जिल्हाध्यक्ष शिक्षक सेल काँग्रेस यांच्याकडून तर प्रोत्साहन पर बक्षीस १ हजार १ रुपये अजय लोंढे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (५००+५०० विभागून दोन), १ हजार १ रुपये सपना क्लाथ स्टोर, गडचिरोली (५००+५०० विभागून दोन) असे देण्यात येणार आहे .
या सापर्धेचे बक्षीस वितरण व व्याख्यान कार्यक्रम ३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता संजीवनी हायस्कूल, सेमाना रोड, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती करीता 7620869761 / 9923815724 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, गडचिरोली म.रा यांनी केले आहे.
तसेच स्पर्धेत सहभागी होण्याकरिता तसेच अधिक माहिती करीत गडचिरोली- अमित सुरजागडे, चामोर्शी-प्रेमानंद गोंगले, धानोरा- प्रतीक्षा शिडाम, आरमोरी- सुजाता अवचट, वडसा- पिंकू बावणे, कुरखेडा- जयश्री प्रधान , एटापल्ली आकाश भांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here