–इच्छुक उमेदवारांनी सहभाग घ्यावा
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), २० सप्टेंबर : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I) येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या सहकार्याने उद्या २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सीओई इमारतीत पंडित दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचेआयोजन करण्यात आलेले आहे.
सदर मेळावा सर्व आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी
(ITI Pass ), इयत्ता बारावी MCVC उत्तीर्ण व पॉलिटेक्निक उत्तीर्ण माजी विद्यार्थांसाठी असून सर्व व्यवसायाच्या उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी भरती मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी टीसीपीसी विभागाचे प्रमुख आनंद मधुपवार (8087258852) यांचेशी संपर्क साधावा . या भव्य रोजगार मेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अवश्य लाभ घ्यावा , असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे.
(ITI) (Gadchiroli) (rojgar melava) (pandit dindayal)