– ४ ऑक्टोबर पर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज
The गडविश्व
– रेल्वेतील २१ रिक्त पदांसाठी थेट भरती केली जाणार आहे. याबाबतची धिसूचना 2022 अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती क्रीडा कोट्याद्वारे केली जाणार आहे. भरती चाचणी आणि क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन, शैक्षणिक पात्रता या आधारे केली जणार असून यासाठी कोणतीही वेगळी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया ५ सप्टेंबर पासून सुरू झाली असून अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे म्हणजेच उमेदवारांचा जन्म २ जानेवारी १९९८ पूर्वी झालेला नसावा आणि १ जानेवारी २००५ नंतर झालेला नसावा. वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्याची तरतूद नाही, पदांसाठी कोणतेही आरक्षण धोरण लागू नाही.
रेल्वे थेट भरती प्रक्रिया विविध निवड टप्प्यांतून केली जाणारा आहे. ज्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील कामगिरी, शैक्षणिक पात्रता चाचणी आणि मूल्यांकन यांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे संघासाठी योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी केली जाईल. चाचणीच्या आधारावर उमेदवारांना ‘FIT’ किंवा ‘UNFIT’ म्हणून घोषित केले जाईल. रेल्वे च्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिरात व्यवस्थित वाचून समजून घेऊन अर्ज करावे.
अर्ज ऑनलाईन करा
अधिकृत संकेतस्थळ
जाहिरात पहा