– स्पर्धत सहभाग घेण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि आदिवासी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ते 28 जानेवारी या कलावधीत मराठी भाषा संवर्धन दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत. 21 जानेवारी रोजी यशस्वी मराठी उद्योजक यांची मुलाखत. आयोजित स्पर्धा स्पर्धेमध्ये 18 जानेवारी रोजी काव्य वाचन स्पर्धा. 24 जानेवारी रोजी प्रश्नमंजूषाचे आयोजन केले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक उमेदवारांनी, 17 जानेवारी पर्यंत https://forms.gle/cbfdRsRpiq3YMCBF7 या गुगल फॉर्म मध्ये माहिती सादर करावी. प्रथम येणाऱ्यास कार्यालयाकडून स्पर्धा परीक्षेचे दोन पुस्तके वितरीत करण्यात येतील. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि आदिवासी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांचेमार्फत करण्यात आलेले आहे.