गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

1575

– आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
The गडविश्व
गडचिरोली , २२ सप्टेंबर : येथील कॉम्प्लेक्स परिसरातील वनश्री कॉलनी मधील महिलेने स्वतःच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
हर्षा गणेश खुणे (३४) वनश्री कॉलनी, सेमाना बायपास रोड नवेगाव गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला ही विवाहित असून तिच्या पच्छात
पती, एक १२ वर्षीय मुलगा व एक ६ वर्षीय मुलगी असल्याचे कळते. पती एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. आज घरात कोणीही नसतांना सदर महिलेने घरातच सिलिंग फॅन ला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलीसांना मिळाली असता घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here