The गडविश्व
गडचिरोली, २३ सप्टेंबर : आदिवासी विकास विभागामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती,शिक्षण फि,परिक्षा फि,चे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ 21 सप्टेंबर 2022 पासुन सुरु करण्यात आलेले आहे.
सन 2022-23 या वर्षाकरीता अनूसूचित जमातीचे जास्तीत जास्त् विद्यार्थ्यांना भारत सरकार पोष्ट मॅट्रीक शिष्यवत्ती, शिक्षण फि,परिक्षा फि, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रतिपुर्ती या योजनांचा लाभ घेता यावा. या करीता पात्र विद्यार्थ्यांकडून सदर संकेस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांचे महाडिबीटी या संकेस्थळावर परीपूर्ण ऑनलाईन अर्ज भरुन कार्यालयास सादर करण्यात यावे.तसेच शैक्षिणक वर्षे 2020-21 व 2021-22 या वर्षातील ज्या महाविद्यालयाचे स्तरावर महाडिबीटी संकेतस्थळावर अर्ज प्रलंबित आहेत अशा महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करावी. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी महाविद्यालय जबाबदार धरण्यात येईल,यांची नोंद घ्यावी.असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांनी केले आहे.