गडचिरोलीतील तलावात आढळलेल्या ‘त्या’ युवकाची हत्याच : आरोपींच्या आवळल्या मुसक्या

1415

– दोन आरोपीना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) २५ सप्टेंबर : शहरातील रेव्हणी कॉलनीतील कुमोद लाटकर या युवकाची हत्या करून मुल मार्गावरील तलावात मृतदेह टाकण्यात आला होता . सदर मृतदेह २० सप्टेंबर ला तलावात तरंगांना आढळून आला होता. या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतीने फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. रोशन पवनसिंह ठाकुर (३५) व अमोल नामदेव दडमल (२५) दोघेही रा. चनकाईनगर, निलेश मारकवार असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी शहरातील तलावात रेव्हणी कॉलणीतील कुमोद लाटकर या युवकाचा मृतदेह आढळला होता. मृतकाच्या डोक्यावर जखम आढळून आल्या होत्या त्यामुळे पोलीसांनी अज्ञाताविरूध्द ३०२ कलान्वये गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाबाबत अधिक वेगाने तपासचक्र फिरवित दोन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले होते मात्र यातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेणे सुरु होते. काल शनिवारी तिसरा आरोपी निलेश मारकवार याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. यातील आरोपी रोशन पवनसिंह ठाकुर व अमोल नामदेव दडमल यांना काल शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी झाली हत्या

मृतक कुमोद, आरोपी रोशन ठाकुर, अमोल दडमल व निलेश मारकवार हे १८ सप्टेंबर रोजी तलावातील पायऱ्यांवर दारू पार्टी करीत होते. ही दारू पार्टी सुरू असताना किरकोळ वाद झाला यावेळी शुल्लक वादातून रोशन याने कुमोदच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले यात त्याचा मृत्यू झाला व त्यानंतर तलावात टाकुण दिले. कुमोदचा मृतदेह दोन दिवसांनी २० सप्टेंबर रोजी तलावात तरंगतांना आढळून आला.

(#Gadchiroli News Murder Gadchiroli Police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here