कोविड काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची थकीत वेतन तात्काळ अदा करा

199

– आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून

The गडविश्व
गडचिरोली : कोविड-१९ च्या वैश्विक महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते आज पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय,महिला व बाल रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामिण रुग्णालय,गडचिरोली येथे कोविड- १९ महामारी मध्ये अविरत सेवा केलेल्या आणि सध्या पण कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची मागील माहे जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंतचे मानधन मिळाले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट उभे झाले आहे . यामुळे लवकरात लवकर त्यांची थकीत मानधन मिळवून देण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनाला अनुसरून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी बहुसंख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here