The गडविश्व
अहेरी, २९ सप्टेंबर : तालुक्यातील किष्टापुर व वेंकटरावपेठा या गावांमध्ये ‘रन फॉर मुक्तीपथ’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही गावातील एकूण ६४ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
किष्टापुर येथील स्पर्धेत ८ युवक, ८ युवती, ७ पुरुष तसेच ८ महिला असे एकूण ३१ गावकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील नायप्पा पिपरे, पोलीस पाटील विजय पिपरे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत मडावी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप मडावी तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. व्यंकटरावपेठा या गावामध्ये १० पुरुष, १० महिला, ९ युवक व ४ युवती अशा एकूण ३३ गावकऱ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. यावेळी पोलीस पाटील लक्ष्मीनारायण राऊत, ग्रामपंचायत सदस्या रमादेवी चिलनकर, माजी ग्रामपंचायत सदस्या मीना गरगम, संदीप राऊत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दारुमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. स्पर्धेनंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच ‘मुक्तीपथ’ व ‘रन फॉर मुक्तिपथ’ मॅरेथॉन याविषयीची ग्रामस्थांना मार्गदर्शन करून दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.