The गडविश्व
देसाईगंज (Desaiganj) २९ सप्टेंबर : तालुक्यातील ग्रामपंचायत कसारी येथे एक दिवस माझ्या बळीराजासाठी उक्रम राबविण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांची सभा घेवून विविध योजनांची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कसारी ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप मडावी हे होत तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती देसाईगंजचे कृषी अधीकारी जितेंद्र गेडाम, विस्तार अधिकारी कृषी अशोक धाबेकर व माजी उपसभापती उईके, उपसरपंच शीवार उपस्थित होते.
कृषी विभागाच्या विविध योजना तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद गडचिरेाली व्दारे राबविण्यात येणाऱ्या योजना व महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बाबतची माहिती देण्यात आली. सध्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना हया ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येतात. यावेळी कृषी अधीकारी जितेंद्र गेडाम यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत सिंचन विहीर, इलेक्ट्रिक कलेक्शन विद्यूत मोटार पंप पाईप या बाबत सखोल मार्गदर्शन केले. व ऑनलाईन अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
५० टक्के अनुदानावर जिवनावश्यक औषधी पंचायत समिती देसाईगंज स्तरावर वितरण सुरू असून धान पिकावर येणाऱ्या किड व रोग यावर सविस्तर माहिती व उपायायोजना यावर विस्तार अधिकारी कृषी धाबेकर यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना, रासायनिक खतांचा वापर, किटकनाशकांचा वापर, नॅनो युरीयाचा वापर व फायदा, श्री पध्दतीने भात पिकांची लागवड फायदे याबाबत माहिती दिली.
हा उपक्रम पंचायत समिती गट विकास अधिकारी श्रीमती प्राजक्ता मस्के व कृषी विकास अधिकारी प्रदीप तुमसरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज नेवारे, शामराव गायकवाड, तानबाजी बनसोड, विश्वनाथ शेंन्डे, शालीक कन्नाके व ग्रामस्थांनी केले.