The गडविश्व
गडचिरोली : आरमोरी शहरातील बर्डी व इंदिरा बेघर येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करा, अशी मागणी नवीन वघाळा बर्डी येथील मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी आरमोरीचे ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावाजवळ सुरु असलेली अवैध दारू विक्रीमुळे वार्डातील व गावातील तरून पिढी वाईट व्यसनाच्या आहारी जात आहे. गावाची शांतता व आरोग्य धोक्यात आले आहे. गावालगतच्या वार्डातील अवैध दारू बंद करण्यासाठी गाव संघटन तयार केले आहे. संघटनेच्या माध्यमातून दारू विक्री करू नका, असे सांगण्याकरिता गेले असता दारूविक्रेत्यांकडुन धमकी देण्यात येते. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी महिलांनी निवेदनातून केली आहे . सोबतच अवैध दारूविक्रेत्यांची यादी सुद्धा पोलिस विभागास सादर करण्यात आली आहे.