वेगळ्या विदर्भ शिवाय पर्याय नाही : नसीर जुम्मन शेख

625

– चोप येथे जय विदर्भ पार्टी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागरण कार्यक्रम
The गडविश्व
देसाईगंज (Desaiganj), २९ सप्टेंबर : वेगळ्या विदर्भ शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा अध्यक्ष नसीर जुम्मन शेख यांनी केले. ते तालुक्यातील चोप येथे जय विदर्भ पार्टी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केशवराव लांजेवार, मार्गदर्शक नसीर जुम्मन शेख जिल्हा अध्यक्ष जय विदर्भ पार्टी, प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक रामेश्वर पैकुजी शेंद्रे जिल्हा महासचिव जय विदर्भ पार्टी, श्यामराव वाघाडे तालुका उपाध्यक्ष, भाऊराव कुथे, मनोहर नाकाडे, लीलाबाई मुंडले माजी सरपंचा, ऋषी पाटील लांजेवार, ओम नेवारे, प्रकाश ठाकरे, कमलेश नाकाडे दादाजी ठाकरे, गौरव नागपूरकर, शेखर कुथे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
या वेळी जय विदर्भ पार्टी जिल्हा अध्यक्ष नसीर जुम्मन शेखविदर्भ राज्याला मार्गदर्शन करताना बोलत होते की, विदर्भ राज्य झाल्यास पाच वर्षात अपूर्ण धरणे पूर्ण होतील व शेतीतील सिंचन ८० टक्के पर्यंत वाढेल, विदर्भाचा जलद विकास होईल, विदर्भातील विजेचा उत्पादन खर्च प्रति युनिट २.४० पैसे येतो त्यामुळे सध्याचे दर निम्यावर येतील. शेती पंपाचे लोड शेडींग व थकीत वीजबिल संपेल, संपूर्ण ग्राहकांना पूर्ण दाबाची वीज मिळेल, विजेचे दर निम्यावर येणार असल्यामुळे मोठे उद्योग लघु उद्योग मोठ्या प्रमाणात येतील व याही खाजगी क्षेत्रातील निघणाऱ्या नोकऱ्या विदर्भातील तरुणांना १०० टक्के मिळतील. मागेल त्याला तत्काळ वीज कनेक्शन मिळेल, सध्या विदर्भात तयार होणाऱ्या सहा हजार तीनशे मेगाव्याट वीज पैकी विदर्भाला केवळ २२०० युनिट वीज मिळते व विदर्भाला ५८ टक्के शेती पंपाचा अनुशेष आहे. सार्वजनिक साठ हजार कोटीचा अनुशेष सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्योग, ग्रामविकास इत्यादी क्षेत्राचा पंधरा हजार कोटी असा एकूण पंच्यातर हजार कोटी रुपयाचा अनुशेष केवळ विजेतून भरून निघेल त्यामुळे सुजलाम सुखालाम सदन आणि शिलकीचे होईल म्हणून विदर्भाच्या जनतेनी फायद्याच्या होणाऱ्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या लढाईत शामिल व्हावे. विदर्भ राज्य होताच शेतकरी कर्ज मुक्त, वीजबिल मुक्त, शेतमालाचे भाव वाढतील बेरोजगारी व नौकरी साठी स्थलांतरणाचा हि प्रश्न नियंत्रणात येईल म्हणून विदर्भ राज्य आपले राज्य असे ते म्हणाले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here