– सालेभट्टी गावाजवळची घटना
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ ऑक्टोबर : छत्तीसगड वरून धानोरा मार्ग गडचिरोली जाणाऱ्या कारचे सालेभट्टी गावाजवळ अचानक टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर अपघात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडला.
छत्तीसगड वरून CG04F185 1 सीजी ०४ एफ १८५१ क्रमांकाचे भरधाव येणारे चारचाकी वाहन मुरुमगाव वरुण धानोरा मार्गे गडचिरोली जात असताना सालेभट्टी गावाजवळ अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटून अपघात झाला. सदर वाहन हे क्षतीग्रस्त झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातत सुदैवाने गाडीत बसलेले सुखरुप आहेत.