देसाईगंज : पोलीसांनी लहान मुलांना पळवुन नेणाऱ्या टोळीतील एका सदस्यास अटक केल्या बाबतच्या केवळ अफवा

717

– पोलीस निरीक्षक महेश ना. मेश्राम यांची माहिती
The गडविश्व
ता. प्र./ देसाईगंज : शहरात लहान मुलांना पळवुन नेणाऱ्या टोळीतील एका सदस्यास पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अटक केली आहे अशी चर्चा सुरू आहे. मात्र केवळ एक अफवा असून अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती पोलीस स्टेशनला अटक नसुन सदर व्यक्ती हा मतीमंद भिकारी असुन त्याचे कडुन लहान मुलांना पळवून नेण्याबाबत कोणतीही घटना घडलेली नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश ना. मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर तालुक्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याबाबत नागरिकांत चर्चा होती तसेच एका मुलीने याबाबतची आपली आपबीती सांगत असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर वायरल झाले होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. आता त्याच प्रकारे देसाईगंज शहरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असून टोळीमधील एका सदस्याला पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अटक करण्यात आली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु असून ती केवळ अफवा आहे असे पोलीस निरीक्षक महेश ना. मेश्राम यांनी दिली असून अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये, लहान मुलांना पळवून नेण्याची घटना पोस्टे हद्दित व गडचिरोली जिल्हयात कोठेही घडलेली नाही, संशयीत ईसम आहे असे म्हणुन शहनिशा न करता मारहान करणे कायद्याने गुन्हा आहे, तसेच सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवु नये, अशी कोणतीही संशयीत व्यक्ती मिळुन आल्यास तात्काळ पोलीस हेल्पलाईन कं. ११२ वर त्वरीत संपर्क साधावा, अशा प्रकारची अफवा प्रसार माध्यमाव्दारे अथवा व्हॉट्सअप, फेसबुक व्दारे किंवा ईतर कोणत्याही सोशलमिडीया व्दारे अफवा पसरवु नये अन्यथा कडक कायद्येशिर कारवाई करण्यात येईल असे आवाहन हि त्यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here