आरमोरी : पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, नुकसान भरपाई बँक खात्यात जमा

254

The गडविश्व
ता. प्र / आरमोरी , ५ ऑक्टोबर : यंदा झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांना पुरपरीस्थितीचा सामना करावा लागला असून कित्येक शेती आजही पडीक आहेत. खरीप हंगाम संपुन आता रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी तयारी सुरू आहे परंतु आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षा करीत होते. मात्र आत पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नुकसान भरपाई बँक खात्यात जमा झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराचा फटका सहन करावा लागला होता. शासनातर्फे नुकसान भरपाई मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी होते. मात्र आता तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई ची रक्कम जमा झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून उर्वरित बैंकेत आज किंवा एक-दोन दिवसात नुकसान भरपाई जमा होणार होणार असल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here