The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑक्टोबर : नागपूर हवामान विभागाने आज-उदया येर्ला अलर्ट जारी केला असून एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शारदा दुर्गा विसर्जणावर पावसाचे सावट उभे आहे.
दुर्गा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. काल दसरा विजयादशमी सण पार पडला. आज काही दुर्गा उत्सव मंडळातर्फे शारदा दुर्गा विसर्जणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाने मात्र विसर्जनावर पावसाचे सावट उभे झाले आहे. गडचिरोली शहरात व जिल्हयात मोठया उत्साहात शारदा- दुर्गा मातेला निरोप दिला जातो. मात्र जिल्हयात हल्ली काही भागात पावसाने हजेरी लावली असून गडचिरोली जिल्हा मुख्यालयात आभाळ काळेभोर झाले असून मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. सायंकाळच्या सुमारास शारदा दुर्गा विसर्जन रॅली काढल्या जाते. हे बघण्यासाठी मोठा जणसागर एकत्रित होत असतो हे विशेष.