– ११०० खेळाडू होणार सहभागी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ९ ऑक्टोबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकिय आश्रम शाळेच्या पंटागणावर प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज रविवार ९ ऑक्टोबर ला प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धास सुरुवात होत आहे. सदर स्पर्धा तिन दिवस चालणाऱ असून या क्रीडा स्पर्धेत ११०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
क्रीडा स्पर्धा चे उदघाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थानी अप्पर आयुक्त रविद्र ठाकरे आदिवासी विकास विभाग नागपूर, विशेष अतिथी म्हणून आमदार डाँ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मिणा, जि.प.मुख्य अधिकारी कुमार आशिर्वाद , आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डाँ.मैनक घोष यांची उपस्थिती राहणार आहे.