नक्षल्यांनी 30 वर्षीय युवकाची केली हत्या

316

– पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयात केली हत्या

The गडविश्व
राजनांदगाव : छत्तीसगड राज्यात नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरूच असून पुन्हा राजनांदगाव जिल्हयात 30 वर्षीय युवकाची पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामजी असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजनांदगाव जिल्हयातील नक्षलग्रस्त कलवर येथे काल मंगळवारी रात्रोच्या सुतमारास 6 ते 10 नक्षली गावात आले दरम्यान मृतक रामजीच्या घरी जावून त्याला घरातून उचलून कांकेर जवळील घुडपाल नाल्याजवळ नेले व पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून काठीने जबरण मारहाण केली यात रामजीचा मृत्यू झाला. आज सकाळी रामजी घरी न परतल्याने परिवारातील सदस्यांनी व ग्रामस्थांनी शाोधाशोध केली असता रामजीचा मृतदेह नाल्याजवळ आढळून आला. याबाबतची माहीती गमास्थांनी मदनवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी अज्ञात नक्षल्यांविरूध्द हत्या करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान छत्तीसगडमध्ये नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरूच असून आठवडयातील दुसरी घटना समजली जात आहे. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here