The गडविश्व
अहेरी, १० ऑक्टोबर : ग्रा.प.रेपणपल्ली अंतर्गत येत असलेल्या सर्वात जुनी वस्ती असलेली (जुनी) रेपणपल्ली येथील गावकऱ्यांच्या अर्जा नुसार १६ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत (जुनी) रेपणपल्ली हे गाव वेगळे करण्यास ग्रामसभामध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले. आता सदर वेगळी करण्यात आलेल्या वस्तीला जुनी रेपनपल्ली असे नाव देऊन गाव घोषित करण्यात यावे याकरिता माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
ग्रा.प.रेपणपल्ली येथील सर्वात जुनी वस्ती ग्रामसभेत वेगळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वेगळ्या करण्यात आलेल्या वस्तीला जुनी रेपनपल्ली हे नाव देऊन गाव घोषित करण्यात यावे याकरिता स्थानिक नागरिकांनी अहेरीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली. तसेच आता गावकऱ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना सुद्धा वेगळ्या करण्यात आलेल्या वस्तीस जुनी रेपनपल्ली हे गाव घोषित करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन सादर केले आहे.
यावेळी गावातील माजी प.स.सभापती सौ.सुरेखा आलाम, मोबीन सडमेक, राकेश सडमेक, कैलास सिडाम, अविनाश कोडापे, सुनील येलाम, गुलाब येलाम, बापू सिडाम, सत्यम आत्राम, दौलत आलाम, दिलीप कोडापे, नरेश सिडाम उपस्थित होते.