गानली समाजाच्या एकजुटीने खंडोबा मंदीराचे निर्माण : जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

441

गानली समाजाच्या एकजुटीने खंडोबा मंदीराचे निर्माण : जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार
– अहेरी येथे सामूहिक कोजागिरी पौर्णिमा चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
The गडविश्व
अहेरी, ११ ऑक्टोबर : गानली समाजाच्या एकजुटीने खंडोबा मंदीराचे निर्माण झाले असे प्रतिपादन जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते अहेरी येथील इंडियन फँक्शन हाॅल मध्ये आयोजीत गानली समाज बहु.मंडळातर्फे सामूहिक कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे प्रतिष्ठित व्येंकटेश बोम्मावार (कंत्राटदार) तसेच प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे प्रतिष्ठित माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार तसेच प्रमुख पाहुणे आणि गानली समाज मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास गद्देवार व्यासपीठावर विराजमान होते. सदर कार्यक्रमात गानली समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम व समाजातील महिलांनी गरभानृत्य सादर केले व पुरुष तसेच बालक वर्ग उत्साहाने सहभागी झालेत.
गानली समाज बहु.मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास गद्देवार यांनी व्यासपीठावरून बोलतांना म्हटले की, समाजातर्फे सुरू असलेल्या मंदिर व सभागृह बांधकामात येत असलेल्या अडचणी समाजापुढे मांडल्या, तसेच कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे प्रतिष्ठित राजू बोम्मावार, सत्यनारायण गद्देवार, लक्ष्मण गद्देवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी समाजातील युवक शिक्षण व रोजगार पासून वंचीत राहु नये. समाज एकजुटीने राहून निर्माण होत असलेल्या खंडोबा मंदिर व सभागृहाचे काम येत्या एक वर्षाच्या आत पूर्ण करून पुढची कोजागिरी आपल्या मंदिरात करु असे प्रतिपादन केले व मी नेहमीच समाजासाठी तत्पर असल्याचे सांगितले.

समाज मंडळा द्वारे धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून त्यांच्या सत्कार करण्यात आला. समाजात विविध उपक्रम राबविले जावेत त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा नेहमीच सहकार्य राहील असे मान्यवरांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्दमा येनगंटीवार यांनी केले तर प्रास्ताविक रविंद्र बोम्मावार, आभार जुगल बोंमनवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गानली समाज बहु.मंडळाचे सदस्य व समाज बांधवांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here