चामोर्शी येथे आम आदमी पार्टीचा तालुका मेळावा संपन्न

203

The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑक्टोबर : आम आदमी पार्टी तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने जिल्हा कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात तालुका संयोजक सुखसागर झाडे तसेच अमन साखरे व इतर कार्यकर्ता मिळून तालुका कार्यकर्ता मेळावा शिक्षक सहकारी पतसंस्था चामोर्शी येथे आयोजित काण्यात आला होतो.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांनी सावित्रीबाई फुले तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, अलकाताई गजबे, मिनाक्षी ताई खरवडे, सोनल न्ननावरे, सुखसागर झाडे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
मेळाव्याला उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत असता आम आदमी पार्टी ही देशात बदल घडवून आननारी एकमेव पार्टी आहे. दिल्ली नंतर पंजाब आणि पंजाब नंतर गुजरात मध्ये सत्ता स्थापनेसाठी केजरीवाल यांचे भरपूर प्रयत्न सुरु आहेत. गुजरात मध्ये पक्षाला विजय मिळणार आहे. देशाचे भविष्य बदलायचे असेल तर आम आदमी पार्टीला सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले. आम आदमी पार्टीचे सरकार दिल्ली मध्ये दोनशे युनिट वीज मोफत देत आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी मोहल्ला क्लीनीक चालवून जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पूर्वीत आहे. गोरं गरिबांच्या मुलांना कान्वेंट स्कुल मधुन मोफत शिक्षण, कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू केली आहे, शुध्द पिण्याचे पाणी मोफत देत आहे. दिल्ली सरकार जर या सर्व सेवा मोफत देत असेल तर महाराष्ट्रात का नाही ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रम संमाप्त झाला. कार्यक्रमाला चामोर्शी तालुका सचिव कातरवार, तालुका युवा संघटक धनराज कुसराम, जिल्हा कमेटी सदस्य सुखदेबजी बोदलकर, जिल्हा युवा सचिव मुकेश जनबंधु,तालुका सदस्य भाविक गेडाम इत्यादी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका महिला आघाडीच्या पल्लवी कोटांगले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here