धानोरा तालुक्यातील निराधारांचे अनुदान पाच महिन्यांपासून थकले

157

– निराधार कुंटूबावर उपासमारिची पाळी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १२ : तालुक्यातील निराधार लोकांचे पाच महिन्यापासुनचे मानधन रखडले असल्याने निराधार कुटूंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
शासन ज्याना कुणाचे आधार नाही अशा कुंटुबाना आधार मिळावा, त्याच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटावा या उदेशाने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी विधवा, इंदिरा गांधी अपंग अशा योजना राबवित आहे. मात्र या योजनेचा निधीच मागील पाच महिन्यापासून तालुकास्तरावर प्राप्त न झाल्याने अनेक कुटूंबाची वाताहत झालेली आहे. त्यामुळे निराधार लोकांची दिवाळी अंधारातच जाणार का ? असा प्रश्न या निमित्याने निर्माण होत आहे. दिवाळी पूर्वी अनुदान शासनाने जमा करावे अशी मागणी योजनेतील गोरगरीब शेतमजूर अपंग निराधार लाभार्थी शासनाकडे करीत आहेत. धानोरा तालुक्यातील निराधार शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना दर एक दोन महिन्याला अनुदान शासनाकडून प्राप्त होत असतो, जिल्हास्तरावरून तहसील कार्यालयात अनुदान प्राप्त झाल्यानंतर लगेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. मात्र मे, जुन, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पाच महिन्यापासून निराधारचे अनुदान जमा न झाल्याने वृद्ध स्त्री-पुरुष दररोज बँकेकडे येतात आणि आल्या पावली परत जातात.
निराधारांना हे अनुदान उपजीविकेचे साधन म्हणून ओळखले जाते. धानोरा तालुक्यात को-ऑपरेटिव्ह बँक धानोरा, कारवाफा, पेंढरी येथील निराधारांचे ग्रामीण बँक धानोरा तर मुरूमगाव परिसरातील लोकांची भारतीय स्टेट बँक धानोरा बँकेत जमा होतात. त्या व्यतिरिक्त तालुक्यालगत जे बँक जवळ असेल त्याला त्यांच्या सोयीनुसार त्या त्या बँकेच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा केल्या जाते. मात्र येथील मुख्य बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असल्याने त्यांचे अनुदान लवकर बँक खात्यात जमा केले जाते. इतर लाभार्थ्यांचे खाते यांना बँकेत असल्याने धनादेश वाटण्यात विलंब होतो त्यामुळेही अनुदान जमा करून सुद्धा धनादेश जमा होण्यास विलंब होत असल्याने निराधार लोकांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here