शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकियेसाठी ९ नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ

705

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये नागपूर विभागातील ६ जिल्ह्यातील एकुण ७० शासकीय वसतिगृहासाठी चालू शैक्षणिक वर्षा करिता व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी ३० सप्टेबरपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. सदर प्रवेशासाठी आता ०९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
व्यवसायीक अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा अद्यापही शैक्षणिक संस्थास्तरावरुन पूर्ण न झाल्याने शासकीय वसतिगृहाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवर्गाची मुदत जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तसेच कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरीता शासनाकडून शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्याकरीता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथून अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत. अधिक माहिती साठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच सबधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, कार्यालय येथे संपर्क साधावा व मुदतवाढीचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here