– प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १५ ऑक्टोबर : पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत असलेल्या बेलगाव येथील युवकाच्या पायावरून अज्ञाताने चारचाकी वाहन नेल्याने झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज १५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. विजय तुकाराम लटारे (१३) असे अपघातात गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली तालुक्यातील बेलगाव येथील विजय तुकाराम लटारे हा आज १५ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत धावायला गेला. दरम्यान बेलगाव ते रानखेडा मार्गावरील मौशिखांब फाट्यावर व्यायाम करित असतांनाच अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या पायावरून चारचाकी वाहन नेल्याने युवकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी युवकावर ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
व्यायाम करणाऱ्या युवकांच्या पायावरून जाणाऱ्या पिकप वाहनाला नंबर प्लेट नव्हती असे लोकांचे म्हणणे आहे. मात्र त्या वाहनांमध्ये काहीतरी चोरीचा माल असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताने लटारे परिवार हादरलेला आहे. भविष्यात मुलाची हानी भरून न निघनारी अशीच आहे. त्यामुळे सदर पिकप वाहनाचा शोध घेवुन वाहनावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.