कायद्याचा आधार घेत अवैध दारू व तंबाखू विक्रीबंदीसाठी कृती करा

176

–  मुक्तिपथ गावसघटन सदस्यांना दिली कायदा पुस्तिका 
The गडविश्व
 गडचिरोली, २० ऑक्टोबर : दारू व तंबाखू बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियान अंतर्गत गाव संघटनेचे सदस्य व ग्रापं समितीच्या सदस्यांना दारू व तंबाखूबंदी कायद्याबद्दलची माहिती असावी, यासाठी पहिल्या टप्प्यात चामोर्शी तालुक्यातील ४० गावांमध्ये संघटन सदस्यांना माहिती पुस्तिका बैठकी द्वारा देण्यात आल्या.

तंबाखू व दारूचा वापर वेगाने कमी करणे हे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य रक्षण व आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरते. गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीचे व मोठ्या प्रमाणात असलेल्या तंबाखूसेवनाचे प्रमाण कमी व्हावे, या प्रमुख हेतूने मुक्तीपथ अभियान जिल्ह्यात कार्यरत आहे. या उपक्रमात प्रमुख सहभाग हा जनतेचा असून त्यांना दारू व तंबाखूवर रोख लावण्यासाठी कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी चामोर्शी तालुक्यातील नवेगाव, कुनघाडा माल, कुरुड, सगणापुर, लखमापूर बोरी, येडानुर, ठाकुरनगर, सुभाषग्राम यासह ४० गावातील मुक्तिपथ गाव संघटनेच्या अध्यक्षांना कायदा माहिती पुस्तिका देऊन संघटनेतील सर्व सदस्यांची बैठक घेऊन संबधित कायदे समजून सांगून कायद्याचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले. या पुस्तिकेत दारूबंदीच्या प्रमुख कलम व कायदे, पेसा कायदा १९९६, ग्रामपंचायत अधिनियम नुसार गावात दारूविक्रीबंदी अधिनियम, सुगंधित तंबाखू, खर्रा, गुटखा बंदी कायदा- २०१२, अल्पवयीन मुलांसाठी संरक्षण कायदा – २०१५, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ कोटपा (COTPA), महाराष्ट्र राज्य अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ कलम ६ नुसार, साथरोग प्रतिबंध कायदा आदी कायद्यांची विस्तृत अशी माहिती देण्यात आली आहे. सदर कायद्याची माहिती मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे, तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी बैठकीत समजून सांगितली व गावात कृती करतांना या कायद्याचा आधार घ्यावा असे सुचविण्यात आले आहे. यावेळी स्पार्क अभ्यासक्रम कार्यकर्ते सोनी सहारे व प्रियंका भुरले ह्या उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here