मुरूमगाव येथे सर्व पक्ष पदाधिकारी व जनतेचा रास्ता रोको आंदोलन

542

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० ऑक्टोबर : तालुक्यातील मुरूमगाव येथे आज १९ ऑक्टोबर ला परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व जनतेच्या सहकार्याने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्तते करिता रास्ता रोको आंदोलन आंतरराष्ट्रीय महामार्ग वरील वनविभाग तपासणी नाक्यासमोर सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत आंदोलकांनी रस्ता रोखून धरणे दिले.
मुरूम गाव येथील सर्व पक्षीय जनतेने दिलेल्या निवेदनानुसार मुरूमगाव येथील सर्वसामान्य लोकांनी विविध मागण्या केल्या त्यामध्ये परिसरातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहावे, मुरूमगाव येथे को-ऑपरेटिव्ह बँक व एटीएम सुविधा उपलब्ध करून द्यावे, प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचि दर्जा देण्यात यावा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत ग्रामीण परिसरातील रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, खरीप हंगामातील धान खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्याचा तपास करून शेतकऱ्यांचे थकलेले चुकारे त्वरित निकाली काढणत यावे, ग्रामसेवक व तलाठी यांनी मुख्यालय उपस्थित राहून जनतेचे दैनंदिन महत्त्वाचे कामे करावेत, शासकीय आश्रम शाळेला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय जोडण्यात यावे, अशा विविध मागण्या ठेवून आज रस्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले.
आंदोलन स्थळाला खासदार अशोक नेते यांचे प्रतिनिधी रवींद्र भांडेकर, प्रकाश गेडाम यांनी भेट दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा स्वप्निल जाधव, कुरखेड्याचे तहसीलदार सोमनाथ माळी, धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलनाकांच्या समस्या ऐकून घेतले तसेच मुरूमगाव येथे १ नोव्हेंबर २०२२ ला खासदार , आमदार आणि जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागातील अधिकारी यांची सभा आयोजित करून मागण्यांच्या निपटारा करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. मात्र सदर तारखेला उपरोक्त पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्या मुळे सभा जर झाली नाही तर पुनच्छ रस्ता रोको आंदोलन तीव्र करावे असे सुद्धा खासदार यांचे प्रतिनिधी व उपविभागीय अधिकारी धानोरा यांनी लेखी स्वरूपात करणाऱ्या आंदोलकांना आश्वासन दिले.
आंदोलनाचे नेतृत्व सरपंच शिवप्रसाद गव्हर्नर , माजी जिल्हा परिषद सदस्या लताताई पुंगाटे , माजी पंचायत समिती सभापती अजमन रावटे , बैसाखुराम कोटपरिया , अभिजीत मेश्राम, राजेंद्र कोतवार, मुकेश मेश्राम , रामलाल मारगिया , रेखा देहारी, अंजुषा मैदमवार, कृष्णाबाई भक्ता , तिवारी भोयर, शिवनाथ टेकाम , मुनीर शेख, प्रदीप कोठवार, धर्मराज गडपायले,प्रभा मेश्राम , अर्चना देशमुख , वसंत कोठियारा, सुरेंद्र कोठपरीया यासह परिसरातील दोन ते अडीच हजाराच्या संख्येने लोक आंदोलन स्थळी उपस्थित होते. आंदोलकासमोर लेखी आश्वासन दिले.
आंदोलन स्थळी रस्त्याच्या दोन्हीकडे ला ट्रकची व अनेक वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या यात कायदा व सुव्यवस्था राखून चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रभारी अधिकारी चंद्रकांत धनके ,पीएसआय गणेश आठवे व पोलीस कर्मचारी जम्मू यांनी चोक बंदोबस्त बजावला.
आंदोलनाचा त्रास शालेय विद्यार्थ्यांना झाला.विद्यार्थी दुपारपासून इतर वाहनांची वाट पाहून पाहून थकले. नाईलाजाने मिळेल त्या साधनाने ये जा करायला लागले तर काहींचे पालक मात्र टू व्हीलर च्या साधनाने मुलांना घेण्यासाठी आले आणि गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here