जहाल नक्षलीस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

353
File Photo

– 2 लाख रूपयांचे बक्षीस शासनाने केल होते जाहीर
– गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ यांची संयुक्त कारवाई

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हयातील पोलीस उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र गट्टा (जां ) हद्दीत आज 14 जानेवारी 2022 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा जां जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली, पोलीस स्टेशन पार्टी गट्टा (जां ) व सीआरपीएफ 191 बटालियनची ई कंपनीचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जहाल नक्षली करण उर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे.
नक्षल दृष्टया अतिसंवेदनशिल मौजा गोरगटटा येथील रहिवासी असलेलाा करण उर्फ दुलसा पेका नरोटे (30) हा प्लाटुन क्र 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. तो गट्टा दलमचा सदस्य तसेच नक्षलच्या ॲक्शन टीमचा सदस्य होता. सन 2008 मध्ये पोलीस स्टेशन भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा याच्या खुनात, उपपोस्टे दामरंचा हद्दीतील कोरेपल्ली चकमक तसेच सन 2010 मध्ये मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहीवासी चुक्कु याचा खुन, सन 2009 मध्ये उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीतील गुड्डीगुडम येथे सागवन लाकडाने भरलेले ट्रक जाळपोळ प्रकरण, त्याचबरोबर 14 ऑगस्ट 2020 रोजी पोमके कोठी येथे दुशांत नंदेश्वर या पोलीस जवानाच्या खुनात हि त्याचा सक्रीय सहभाग होता.
11 जून 2020 रोजी किदरटोला येथे झालेल्या रवी झुरू पुंगाटी रा. गुडंजुर, सन 2021 मध्ये पोमके गट्टा (जां.) वर दोन वेळा झालेल्या पोलीस स्टेशन हमला, पोमके बुर्गीवर झालेल्या पोलीस स्टेशन अटॅकमध्ये तसेच 18 सप्टेंबर 2021 मध्ये सुरजागड येथे झालेल्या सोमाजी चैतु सडमेक याच्या खुनामध्ये, 26 फेब्रुवारी 2021 रोजी लग्नाकरीता पत्नीसह पुरसलगोंदी येथे गेला असतांना अशोक रामु कोरसामी रा. मंगुठा याच्या खुनामध्ये व 03 एप्रिल /2021 रोजी रामा मंगु तलांडी रा. बुर्गी यांच्या खुनामध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता तसेच 11 जानेवारी 2022 रोजी नारगुंडा परिसरात दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करून त्यांचेकडील जीपीएस, हॅमर, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य पळवून नेण्याच्या गुन्ह्रातही सहभागी होता. जिल्हयातील वेगवेगळया हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असुन त्याच्यावर खुनाचे 06, चकमक 04, दरोडा 02, जाळपोळ 03, अपहरण 01 असे एकुण 16 गुन्हे दाखल होते.
त्याच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने त्याचेवर 02 लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. याव्यतिरीक्त त्याचा आणखी किती गुन्ह्रांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.
सदर अभियान पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधिक्षक (अभियान) .सोमय मुंडे, अपर पोलिस अधिक्षक(प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडले. पो.अधिक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here