गडचिरोली : शहरातील न.प. च्या नळाच्या पाण्यात आढळल्या अळ्या

2115

– नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑक्टोबर : नगर परिषदेमार्फत नागरिकांच्या घरी पुरविण्यात येणाऱ्या नळाच्या पाण्यात मागील ७ ते ८ दिवसापासून जिवंत अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गडचिरोली नगर परिषदेमार्फत घरोघरी नळाद्वारे पाणी पुरविल्या जाते. मात्र शहरातील रामनगर वार्ड हजारे आटा चक्की परिसरातील काही नळ धारकांच्या घरी न.प.च्या नळाद्वारे पुरविण्यात आलेल्या पाण्यात मागील ७ ते ८ दिवसांपासून जिवंत अळ्या आढळून आल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी न.प. सूचित केले असता न.प.कर्मचाऱ्यांनी घरी भेट घेऊन माहिती घेतली तरी मात्र पुन्हा नळाद्वारे अळ्या आढळून आल्याने नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अतुल हजारे, मनोहर शेडमाके, नितीन बनकर, सुरेश मडावी, कालिदास मडावी, कुडकलवार, दीपक सातपुते, वरगंटीवार यांच्या घरातील नळाच्या पाण्यात अळ्या आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली असून इतरही घरी हा प्रकार घडला असेल हे ही नाकारता येत नाही.
तर मागील काही महिन्यांपूर्वी चामोर्शी मार्गावरील नगर परिषदेच्या नळाच्या पाईप मध्ये इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी अनेक दिवस नागरिकांनी नळाचे पाणी घेतलेच नाही. आता पुन्हा शहरातील रामनगर परिसरात नळाच्या पाण्यात अळ्या आढळल्याचा धक्कादायाक प्रकार उघडकीस आल्याने नागरिक नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. सदर प्रकाराबाबत नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याशी फोन वर संपर्क केला असता फोन चा उत्तर मिळाले नाही. नगर परिषदेने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन समस्या सोडवावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

©©©©©

#gadchirolinews #nagar parishad #gadchiroli #thegadvishva

नळाद्वारे आलेल्या अळ्या नागरिकांनी अश्या वाटीत जमा केल्या
नळाद्वारे आलेल्या अळ्या नागरिकांनी अश्या वाटीत जमा केल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here