-विक्रेत्यावर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑक्टोबर : धानोरा तालुक्यातील सालेभट्टी येथील एका विक्रेत्याच्या घरातून २६ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केल्याची कारवाई धानोरा पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने शुक्रवारी केली.
सालेभट्टी येथील अवैध दारूविक्रेता महिला गीता तुळसीदास शेंडे चोरट्या मार्गाने दारूविक्री करीत होते. घरातूनच अवैध व्यवसाय चालवीत असल्याने त्याच्या घरापुढे गाव व परीसरातील मद्यपीची लाईन लागून असायची. यामुळे गावातील महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भातील माहिती मिळताच धानोरा पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शेंडे यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी घराची झडती घेतली असता, २०४ देशी-विदेशी दारुसह बियरच्या बॉटल्स आढळून आल्या. पोलिसांनी २६ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर विक्रेत्यावर वारंवार पोलीस कारवाई होऊनही त्यानी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. ही कारवाई धानोराचे पोलिस निरीक्षक देडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांच्या उपस्थितीत पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी तालुका संघटक अक्षय पेद्दीवार यांच्यासह तालुका चमू उपस्थित होते.