– मातोश्री व वेदांती या वृद्धाश्रमात दिवाळी फराळाचे वाटप
The गडविश्व
गडचिरोली, २४ ऑक्टोबर : स्थानिक लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील मातोश्री व वेदांती वृद्धाश्रमात दिवाळी सणाचे औचित्य साधून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे संचालक प्रा. राजीव खोबरे व प्रा. आशिष नंदनवार, अनिल चापले, गोविंद धांडे, हरीश कोलते, मयुरी ठाकरे, चैतन्य भसारकर, कार्तिक आरेवार, हिमेश्वरी सिडाम,गणेश दंडकीवार, प्रीतम मारबते, रोहित आलाम, भूषण घोगरे, स्वप्निल पत्रोजवार, मनीष, अजिंक्य, दर्शन, रितिक, आदित्य, सचिन रंगारी, गिरीधर,अश्विनी, रिकेश, ज्योती, सौरव, आशिष सहारे, नागेश, आदर्श, बबलू,अतुल, आचल, भाग्यश्री,चैतन्या, दिनेश, श्रेयश, कौशिक या विद्यार्थ्यांनी “एक हात मदतीचा” या उपक्रमालाआर्थिक स्वरूपात मदत केली..