The गडविश्व
नवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिसातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीला अनोखी भेट दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना IPS केडर जाहीर करण्यात आले आहे. खरंतर 2019 पासून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची यादी प्रलंबित होती. अखेर केंद्र सरकारने 2019 आणि 2020 ची प्रलंबित यादी जाहीर केली आहे. ही यादी आज मकरसंक्रांतीच्या दिवशीच जाहीर झाल्याने राज्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारकडून मकरसंक्रांतीचे गिफ्ट देण्यात आल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत 2019 च्या 8 तर 2020 च्या 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने याबाबतचे अधिकृत आदेश पारीत केले आहेत. विशेष म्हणजे 14 अधिकाऱ्यांपैकी डी एस स्वामी आणि एस पी निशाणदार हे मुंबईत डिसीपी होते.
14 अधिकाऱ्यांमध्ये
2019 सिलेक्शन मधील
एन ए अष्टेकर
मोहन दहिकर
विश्वा पानसरे
वसंत जाधव
श्रीमती स्मार्तन पाटील
एस डी कोकाटे
पी एम मोहीते
संजय लाटकर
2020 सिलेक्शन मधील
सुनील भारद्वाज
सुनील कडासने
संजय बारकुंड
डी एस स्वामी
अमोल तांबे
एस पी निशाणदारL
यांचा समावेश आहे. ज्या अधिकाऱ्यांना आयपीएस केडर मिळाले आहे ते आता थेट भारतीय पोलीस दलात असणार आहेत.