आर्वी गर्भपात प्रकरण : आणखी एक कवटी आढळल्याने खळबळ

255

The गडविश्व
वर्धा : जिल्ह्यातील आर्वी गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज पुन्हा कदम रुग्णालय परिसरात एक कवटी आढळली आहे. त्यामुळे आर्वी येथील गर्भपात प्रकरण अधिक गंभीर होत चालले आहे. आतापर्यंत एकूण १२ कवट्या आणि ५४ हाडे आढळल्या आहेत. नागपूर आणि वर्धाच्या फॉरेन्सिक टीमने तपासणी केली होती.
वर्ध्यामधील आर्वी येथे एका १३ वर्षांच्या मुलीचा गर्भपात केल्याचे उघड झाले आहे. कदम हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार सुरु होता. ३० हजार रुपयांत कदम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात शोध घेतला असता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. पोलिसांच्या तपासात हॉस्पीटलच्या गोबर गॅसच्या टाकीत ११ कवट्या आणि अर्भकाच्या हाडांचे ५४ तुकडे सापडले होते. त्यानंतर तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, फॉरेन्सिक टीम तपासणीत गॅस चेंबरमध्ये पुन्हा एक कवटी आढळली आहे. फॉरेन्सिक टीमने कवटीसह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये रक्ताचे नमुने आणि बायोमेडिकल वेस्ट सुद्धा जप्त केले आहे. बुधवारी तपासणीदरम्यान 11 कवट्या आढळळ्या होत्या आणि आज पुन्हा नव्याने एक आढळल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here