The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ नोव्हेंबर : तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परसराम पदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्र ब्राह्मणवाडे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी आदेश काढून नियुक्ती केलेली आहे.
यापूर्वी तालुका अध्यक्ष पद माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्याकडे होते. बऱ्याच दिवसापासून इतरत्र त्यांना जिल्हास्तरीय कामाकडे वेळ देत होते, आता तालुक्याची धुरा नवनियुक्त तालुकाध्यक्ष परसराम पदा यांच्याकडे आल्याने काँग्रेस मध्ये एकजुटीचे काम करून विश्वासात घेऊन अधिका अधिक काँग्रेस पक्षाला धानोरा तालुका आघाडीवर ठेवतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
नियुक्तीचे श्रेय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार उसेंडी, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तसेच समस्त काँग्रेस यांना देण्यात आले आहे.