ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

148

– कंत्रादारावर कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा माजी जि .प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, ४ नोव्हेंबर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, पटसंख्या वाढावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आले मात्र गडचिरोली जिल्ह्यात याच योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होतानाचे चित्र असून ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे आहे त्यामुळे कंत्रादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली असून तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. अश्या ग्रामीण भागातल्या काही शाळांमध्ये पोषण आहारासाठी बुरशी आलेली तूरडाळ, कुजलेला वाटाणा आणि माती मिसळलेल्या अळ्या लागलेले तांदूळ असे धान्य पुरवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थी पट संख्या वाढावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी लागावी, प्रकृती सुधारणा व्हावी यासाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी शाळेतली खिचडी न खाता घरचे जेवण पसंत करतात. वितरण करण्यात आलेले पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तुरडाळ भिजलेली असल्याने तुरडाळ वर बुरशी आली आहे, वाटाणा कुजलेला तर माती मिसळलेले तांदूळ आहे. या तांदळाला अळ्या लागल्या आहे, हे धान्य मनुष्य काय तर प्राण्यांच्या ही खाण्याच्या दर्जाचे नाही. अशा परीस्थिती रोग प्रतिकारक क्षमता कमी असलेल्या लहान विद्यार्थ्यांना सडलेले धान्य पोषण आहाराच्या नावाने खायला देणे म्हणजे या चिमुक्ल्यावर एका प्रकारे अत्याचार करणे आहे असे मत माजी जि .प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मांडले असून लगेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आता प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here