– किष्टापूर येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी, ६ नोव्हेंबर : युवक हा देशाचा आधारस्तंभ असुन युवकांनी खेळासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत व्यक्तीमत्व विकासाला चालना घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथे जय सेवा युवा मंडळ,किष्टापूरच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी उदघाटन प्रसंगी उदघाटन स्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलतान ते म्हणाले म्हणाले आज ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत. प्रत्येक ठिकाणी माझ्या स्वतः कडून पारितोषिक देत असताना माझा एकच उद्देश्य आहे युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगले खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावचा व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो. हे होत असताना गावातीला सामाजिक, शैक्षणिक व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याचे निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.
या स्पर्धा मध्ये प्रथम पुरस्कार २५००१ हजार रुपये, दितीय २१००० हजार रुपये ,तर तृतीय ११००० हजार रुपये,याठिकानी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलापल्ली चे माजी सरपंच विजय कुसनाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच किशोर आत्राम वेलगुर, उपसरपंच उमेश मोहूर्ले वेलगुर, माजी उपसभापती गीताताई चालूरकर , नरेश मडावी ग्रा.प.सदस्य कीस्टापूर,अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच दिलीप गंजीवार साहेब आलापल्ली, संदीप बडगे , जुलेख शेख, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, दादाराम मडावी,हरिभाऊ आत्राम, अनंत साना, कालिपद वैद्य, सोमाजी आत्राम, आनंदराव चहाकाटे, प्रकाश दुर्गे, राकेश साडमेक उपस्थित होते.
जय सेवा युवा मंडळ किष्टापूरच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे अध्यक्ष हरी आत्राम, उपाध्यक्ष अनिल दब्बा,मधुकर झोडे, सचिव जीवन आत्राम , सहसचिव गौतम गावळे, कोषाअध्यक्ष मनीष मडावी, क्रीडाप्रमुख अजित आत्राम इत्यादी मंडळगण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्ववीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग प्रयत्नशिल होते.