आम आदमी पार्टी कोरची तालुका कार्यकारीणी गठीत

185

The गडविश्व
गडचिरोली, ७ नोव्हेंबर : जिल्ह्यातील आम आदमी पार्टी कोरची तालुका कार्यकारिणी नुकतीच गठीत करण्यात आली.
आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे कोरची येथील नगरपंचायत सभागृहात जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात युवा कार्यकर्ते मुकेश नरोटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे राजूभाऊ मडावी तर जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांचें स्वागत मोरेश्वर मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
उपस्थित प्रमुख अतिथीनि ‘आम आदमी पार्टी’ दिल्ली आणि पंजाब मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली. मोफत विज, दर्जेदार शिक्षण, शुद्ध मुबलक पाणी, चांगल्या आरोग्य सेवा दिल्ली व पंजाब सरकार जर देत असेल तर महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या सेवा सरकार का देत नाही ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वाढलेली महागाई, बेरोजगारी, कमी करायची असेल तर आज महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात कार्य करण्याची गरज आहे. देशाला नंबर वन बनवण्याचे आम आदमी पार्टीचे स्वप्न साकार करण्यासाठी पार्टी कार्यकर्ता गावा गावात जाऊन सर्व सामान्य माणसाला जागवण्याची नितांत गरज आहे असे सुतोवाच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तालुका कमेटी गठीत करण्यात आली. दरम्यान तालुका संयोजक मुकेश नरोटे, तालुका महिला संयोजक अंजना बोगा, तालुका युवा संयोजक बाबुराव मडावी, जेष्ठ नागरिक आघाडीचे कराडे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी आरमोरी तालुका संयोजक मोरेश्वर मसराम कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश नरोटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here