The गडविश्व
अमिर्झा, ७ नोव्हेंबर : येथील तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगल ६ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकले.
आकाश अरुण घोडमारे (२७) रा.अमिर्झा असे वराचे नाव आहे तर उर्मिला बंडूजी गायकवाड (२२) रा. उसरपार तुकूम पो.पाले ता.सावली जि.चंद्रपूर असे वधूचे नाव आहे. दोघांचेही मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. दोघांचेही लग्न करून संसाराचा गाढा चालवण्याचे ठरले मात्र मुलीच्या आई वडिलांचा लग्नास विरोध होता. दरम्यान दोघांनीही तंटामुक्त समिती अमिर्झा येथे रीतसर अर्ज केला.कागदपत्रांची तपासणी करून तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने तथा ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांच्या साक्षीने दोघेही विवाह बंधनात अडकले.
यावेळी तंमुस अध्यक्ष सुजित आखाडे, उपसरपंच संदीप भैसारे, ग्रामपंचायत सदस्य पंढरी चौके, मनोज भनारकर,रमेश चौधरी, धनराज चौधरी, सुरेश नागरे, राजू पठाण, चंदू करंडे, अजय शिरपूरवार, महेश देशमुख, मोहन देशमुख, मंदाबाई सावसाकडे, कालिदास श्रीरामे, चेतन घोडमारे, टिकाराम नन्नावरे आदी उपस्थित होते.