नक्षल्यांचा पोलिसांवर आणखी एक हल्ला : दोन जवान जखमी

343

– ५ तासात दुसरा हल्ला

The गडविश्व
कांकेर : जिल्हयात नक्षल्यांनी काल सकाळच्या सुमारास पोलीसांवर हल्ला करत आईडी ब्लास्ट घडवून आणला यात एसएसबीचा एक जवान गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली होती. मात्र नक्षली एवढ्यावरच न थांबता पुन्हा ५ तासांनी एसएसबी जवान शोधमोहीम राबवून परत येत असतांना आयईडी ब्लास्ट घडवून हल्ला केला यात पुन्हा दोन जवान जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार , कांकेर जिल्हयातील ताडोकी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोसरूंडा कॅम्प जवळ एसएसबीचे जवान काल सकाळच्या सुमारास नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांनी पोलीस जवानांवर आईडी ब्लास्ट घडवून हल्ला केला. यात एक जवान गंभीर जखमी झाला होता. ५ तासांनी म्हणजेच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवान शोधमोहीम राबवून परत येत असतांना तुमापाल व पतकालबेडा परिसरात आणखी नक्षल्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून जवानांवर हल्ला केला . यात दोन जवान गंभीर जखमी झाले आहे. घटनेला पोलीस अधीक्षक शलभ कुमार सिन्हा यांनी दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here