The गडविश्व
गडचिरोली, ८ नोव्हेंबर : अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी लेखिका स्वाधिनता बाळेकरमकर यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभाग अध्यक्ष अश्लेष माडे यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली आहे.
स्वाधिनता बाळेकरमकर यांच्या साहित्य क्षेत्रातील अनुभवातून समाजाला एक नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यांच्या साहित्यातून समाजाला वैचारिक प्रेरणा मिळालेली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभाग अध्यक्ष अश्लेष माडे यांनी त्यांची निवड केली. त्यांचा निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातील साहित्यिक संघ व मित्र परिवारातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.