चिमूर : जनता विद्यालय तथा क. महाविद्यालय नेरी येथे शाळांतर्गत क्रिडा स्पर्धेचे आयोजन

364

The गडविश्व
ता.प्र / चिमूर, ९ नोव्हेंबर : तालुक्यातील नेरी येथील जनता विद्यालय तथा क. महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम घेतले जातात . विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा याकरिता विद्यालयात क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिडा स्पर्धेच्या आयोजनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक तथा प्राचार्य एस. एन. येरने यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी पर्यवेक्षिका कु. बमनोटे मॅडम, क्रिडा तथा शारीरिक शिक्षक एम. एम. पिसे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

#chimur #neri #schoolSports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here