The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १० नोव्हेंबर : तालुक्यातील पोटगाव येथील धान खरेदी केंद्राचे आज आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले. आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येत असलेल्या वडसा तालुक्यातील आविका सोसायटी पिंपळगाव ची धान खरेदी केंद्र पोटगाव येथील खासगी गोडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता परिसरातील शेजाऱ्यांना धान विक्री करीता सोयीस्कर होणार आहे.
धान खरेदी केंद्र शुभारंभ प्रसंगी आमदार कृष्णाजी गजबे, पोटगावचे सरपंच विजय दडमल, उपसरपंच पंकज वंजारी, मा.पं.स. सदस्य शिवाजी राउत, आदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष कृष्णाजी भोयर, ग्रेडर विश्वनाथ मडावी, ग्रा.पं. सदस्या तान्हाबाई मेश्राम, विठ्ठलगावचे सरपंच धांनगुने , चांगदेव हर्डे, सुधाकर अवसरे, किरण बंनसोड, साईनाथ मेश्राम, गणपत वाघाडे व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्मचारी तसेच शेतकरी वर्ग व गावकरी उपस्थित होते.