– गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांचा सत्कारनअहेरी येथे निरोप समारंभ व सत्कार संपन्न
The गडविश्व
अहेरी, १३ नोव्हेंबर : पंचायत समिती अहेरी येथे मागील आठ वर्षांपासून कार्यरत शिक्षण विभागाच्या प्रमुख गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांनी गटशिक्षणाधिकारी म्हणून विद्यार्थ्यांचे गुणवत्तेसाठी केलेले कार्य प्रशंसनीय आहे असे प्रतिपादन जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले .
गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांचे स्थांनातरन धानोरा पंचायत समिती येथे झाल्याने त्यांना गटसाधनकेंद, सर्व केंद्रप्रमुख व तालुक्यात गुणवत्तेसाठी काम करणारे कैवल्य फाउंडेशन यांचेकडून संयुक्तरित्या निर्मला वैद्य व त्यांचे यजमान अरुन वैद्य यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
स्थानिक रुद्रा रेस्टारेंड येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे होते तर प्रमुख उपस्थिती नगरपंचायत अहेरीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सत्कारमूर्ती निर्मला वैद्य, अरुण वैद्य, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र मुंगमोडे, जेष्ठ शिक्षक प्रकाश दुर्गे, लेखाधिकारी तेजराम दुर्गे यांची होती.
अहेरी पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून विद्यार्थ्यांचे गुणवत्तेसाठी निर्मला वैद्य यांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. त्यांनी शिक्षकासह सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन व सर्वाना समान न्याय देत केलेले कार्य हे अतुलनीय आहे. पुढे सुध्दा त्यांचेकडुन अशाच कामाची अपेक्षा अजय कंकडालवार यांनी व्यक्त करित शुभेच्छा दिल्यात. आपण अहेरी तालुक्यात प्रामुख्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळायला हवे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. याचे मला मानसिक समाधान आहे. शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न होते ते सोडविण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले. तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व गटसाधनकेंदातील सर्व विषय साधन व्यक्ती, विषेश शिक्षक, लेखाधिकारी तेजराम दुर्गे व पंचायत समीती येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले यामुळेच आपण तब्बल आठ वर्ष यशस्वीपणे काम करु शकलो या सर्वांचे निर्मला वैद्य यांनी यावेळी आभार मानले.
गटशिक्षणाधिकारी रामचंद्र मुंगमोडे , केंद्र प्रमुख सुनिल आईंचवार, जेष्ठ शिक्षक प्रकाश दुर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त करित गटशिणाधिकारी निर्मला वैद्य यांना पदस्थापनेच्या ठीकाणी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाधिकारी तेजराम दुर्गे यांनी केले.संचालन साधन व्यक्ती ताराचंद भुरसे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार साधन व्यक्ती सुषमा खराबे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी गटसाधनकेंदातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.