जि.प. उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथे बालक दिन उत्साहात साजरा

166

The गडविश्व
गडचिरोली, १४ नोव्हेंबर : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालक दिन म्हणून साजरी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेप्रा च्या सरपंचा श्रीमती शशिकला झंजाळ , विशेष अतिथी माजी पं.स. सदस्य नेताजी गावतुरे, प्रमुख अतिथी आंबेशिवणीचे केंद्रप्रमुख प्रभाकर बारशिंगे, माजी उपसभापती मनोहर पाटील झंजाळ , शा.व्य.समिती अध्यक्ष विनोद भांडेकर, शा.व्य.समिती उपाध्यक्ष किशोर नरुले उपाध्यक्ष, ग्रा.पं. सदस्य दिलीप गावतुरे, ग्रा.पं.सदस्य विनोद चुनारकर, शा.व्य.समिती सदस्य ईश्वर बावणे, जेप्रा चे विस्तार अधिकारी ठाकरे, रॉकाँ सचिव संजय शिंगाडे सचिव, शाळेचे मुख्याध्यापक आशिष बांबोळे, बाळकृष्ण नैताम , रूमाजी चूधरी, दिलीप बावणे, प्रदीप मेश्राम, ईश्वर धकाते, टिकाराम गावतुरे, मुखरु कोरेवार, नरुले, गोवर्धन, समीर भजे, कुमारी आशा हर्षे मॅडम, कुमारी माया भैसारे मॅडम उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात आला. बालक दिनाचे औचित्य साधून पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी बालक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. बाल दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,चमचा गोळी,संगीत खुर्ची व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले तसेच प्रशस्तीपत्रक सुद्धा देण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
यावेळी केंद्रप्रमुख बारशिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बांबोळे, संचालन समीर भजे तर आभार कुमारी हर्षे मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here