-कोचिनारा गाव संघटनेच्या महिलांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील कोचिनारा येथील अवैध दारू विक्रेत्यांची यादी गाव संघटनेच्या महिलांनी कोरची पोलिसांना सादर करीत गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.
कोचिनारा गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. कोरची पोलिसांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात सुरू असलेली अवैध दारू विक्रीमुळे गावातीत तरुण पिढी वाईट व्यसनाच्या आहारी जात आहे. गावाची शांतता व आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी गाव संघटन तयार केलेली आहे. गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी पोलिस विभागाने सहकार्य करावे, अशी मागणी गाव संघटनेच्या महिलांनी केली आहे.