The गडविश्व
गडचिरोली, १५ नोव्हेंबर : आम आदमी पार्टी जिल्हा कार्यालय, कॅम्प एरिया येथे गडचिरोली येथे शहीद बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते माल्याअर्पण करण्यात आले व त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच उपस्थित आम आदमी पार्टी जिल्हा सचिव भास्कर इंगळे यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून मानवंदना दिली.
कार्यक्रमाला जिल्हा कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, जिल्हा संघटनमंत्री देवेंद्र मुनघाटे, जिल्हा युवा संयोजक नामदेव पोले, जिल्हा महिला सहसंयोजक अल्काताई गजबे, जिल्हा महिला शहर संयोजक समीता गेडाम, युवा महिला संयोजक सोनल ननावरे, जिल्हा महिला संयोजक मीनाक्षी खरवडे, अल्काताई खेरकर, शहर सहसंयोजक गणेश त्रिमुखे, शहर संघटन मंत्री हितेंद्र गेडाम, तालुका संयोजक आचित ठाकूर, तुळशीराम भैसारे, सुभाष गेडाम इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
#Birasamunda #gadchirolinews #aap #aamadmiparti #gadchiroli