– जिमलगट्टा येथे वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतड्याचे अनावरण व बिरसा मुंडा जयंती साजरी
The गडविश्व
अहेरी, १६ नोव्हेंबर : समाजाची उन्नती करण्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे आदिवासी गोटुल समिती कडून बिरसा मूंडा जयंती व वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतड्याचे अनावरण कार्यक्रम निमित्ताने उदघाटन स्थानावरून बोलत होते.
जिमलगट्टा येथे आदिवासी गोटुल समिती कडून बिरसा मूंडा जयंती व वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतड्याचे अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता. ययावेळी आदिवासीचे आराध्य देवी देवताचे पूजा अर्चना करण्यात आली. सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके, बिरसा मूंडा, यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो पूजा करण्यात आले. वीर बाबूराव शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या पालखी घेवून भव्य दिव्य रैली काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले आज आपण वीर बाबूराव शेडमाके यांच्या पूतडाच्या अनावरण व बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम आपण साजरी करत आहोत त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून समाजचे उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आदिवासी बांधवाना पेसा कायदा, वन हक्क कायदा, आदिवासीचे रुंढी, परंपरा, जल जंगल ज़मीन विषय सखोल अशी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सोमजी वेलादी, भूमका महासंग सचिव व गोंडी प्रचारक शंकर गावडे आदि होते. कार्यक्रमाचे मुख्य आथिती रियाज भाई शेख, अहेरीच्या माजी सभापती सुरेखा आलाम,आश्रम शाळेचे मुख्याध्यापक कलिक, कमलापूरचे आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नैताम, जिमलगट्टा चे सरपंच पंकज तलांडे, बामणी चे सरपंच अजय आत्राम, पेठा च्या सरपंचा शांताताई सिडाम, कोजेड च्या माजी उपसरपंचा ज्योतीताई मडावी , सयाम, खडू , पोटे, पेरामा चिंनाजी मिसाल, प्रमोद कोडापे, सलाम भाई, शिवराम ,व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन सुंदर नैताम यांनी केले. सायंकाळी भोजन करून आदिवासी सांस्कॄतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील ग्रुपने सहभाग घेतला. यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.