एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाची नैराश्येतून आत्महत्या

241

– PSI च्या शारीरिक चाचणीत केवळ एका गुणामुळे गेली होती संधी

The गडविश्व
पुणे : कोरोना संकटाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामुळे तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात जात आहेत. यातून आत्महत्येसारख्या घटना घडत आहेत. अशीच घटना नुकतीच पुण्यात घडली आहे. पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. अमर मोहिते असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
अमर मोहिते हा पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. मागील 2 वर्षापासून तो PSI ची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. काल मित्रांना भेटला त्यावेळी तो निराश वाटला. त्यातूनच आज त्याने रूमवर आत्महत्या केली. मराठा आरक्षण टिकले असते तर त्याची संधी हुकली नसती असे बोलल्या जात आहे. या घटनेनंतर सध्या त्याच्या नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here